New day New Life
सांग स्पर्शून गेला तुला
माझ्या मनातील वारा
का थरथरली कांती तुझी
का अंगावर शहारा .
गे निळावंती तू चुंबिशी
जानकी जननी माया
का निखळूनी गेला हलकेच
तुझ्या कुंडीतला तारा
ती ओढ चंद्र सजणाची
मन मनास छाया
बघ वेगे वेगे धावती
त्या जळवंती धारा
त्या तरू शिखरी ते
हिरवे पान पाहाया
कसा पहा उठला
इवल्या कळीस धुमारा
Comments
Post a Comment